मार्चमधील अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार १७७ कोटींची मदत

मार्च-२०२३ मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत अवेळी व आकस्मिक झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने दिलासा देण्याकरिता मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला.

दि. ४ ते ८ मार्च व दि. १६ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत झालेल्या अवकाळी व आकस्मिक पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. आकस्मिक पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली नैसर्गिक आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान पातळी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येते.

मार्च २०२३ मधील अवेळी व आकस्मिक पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी खालील प्रमाणे विभागनिहाय वितरित करण्यात आला आहे.

असे होईल विभागनिहाय अवकाळी अनुदान निधी

  • अमरावती विभाग     :        २४ कोटी ५७ लाख ९५ हजार
  • नाशिक विभाग         :        ६३ कोटी ९ लाख ७७ हजार
  • पुणे विभाग              :        ५ कोटी ३७ लाख ७० हजार
  • छ. संभाजी नगर       :        ८४ कोटी ७५ लाख १९ हजार
  • एकूण निधी             :        १७७ कोटी ८० लाख ६१ हजार

19 मार्च पर्यंत झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मदत वितरीत

महाराष्ट्रातील वर विभागनिहाय महसुली मंडळात 4 ते 8 मार्च, 2023 आणि 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असतांना अवकाळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

मार्चमधील झालेल्या अवकाळी व नैसर्गिक आकस्मिक पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने सरकारने ठोस पाऊल उचलले असून निधी वाटप करण्यासंदर्भात पुढील प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. यामुळे अवकाळी व आकस्मिक पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ थेट मिळणार आहे.

मार्चमधील अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार १७७ कोटींची मदत हा लेख आपणास आवडला असल्यास तुमच्या १० मित्रांना शेअर करावा व कृषिविषयक बातम्या, चालूघडामोडी व नवनवीन सुधारित तंत्रज्ञान याबद्दल माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या Modern Agrotech या मराठी ब्लॉग वेबसाईटला Subscribe करून सहकार्य करावे.

Prajwal Digital

1 thought on “मार्चमधील अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार १७७ कोटींची मदत”

Leave a Reply