कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक व सहाय्यक अधीक्षक पदाची सरळसेवा भरती-२०२३

राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, लातूर. व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक ही पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल,२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- क्र.मकसी-१००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. विभागीय कृषी सहसंचालक, लातूर व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

वरिष्ठ लिपीकः एकूण पदसंख्या – १४  

कृषि विभाग सरळसेवा भरती-२०२३ करिता पुणे आयुक्‍तालयामार्फत कोल्‍हापूर विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग व औरंगाबाद विभागातून सहायक अधीक्षक व वरिष्‍ठ लिपीक या दोनच पदासाठी अर्ज करण्याचा दि. 6 April ते 20 April पर्यंत राहील. फार्म हा ऑनलाईन पध्‍दीने भरता येईल. तरी कृषि ड‍िप्‍लोमा, कृषि पदवीधर व कृषि पदव्‍युत्‍तर धारक किंवा वरिष्‍ठ लिपीक पदासाठी इतर शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.

महाराष्ट्रातील विभागनिहाय सहाय्यक अधीक्षक/वरिष्‍ठ लिपीक जागा :

  1. कोल्‍हापूर विभाग एकूण जागा : १८
  2. नाशिक विभाग एकूण जागा : १८
  3. नागपूर विभाग  एकूण जागा : १६
  4. औरंगाबाद विभाग एकूण जागा : २५
  5. पुणे आयुक्तालय : ६०

वरील जागेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र कृषि विभाग https://krishi.maharashtra.gov.in/ यांच्या संकेतस्थळावरील भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी.

वेतनश्रेणी:-

अ.क्र.पदाचे नाववेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर
सहाय्यक अधीक्षकS-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
वरिष्ठ लिपिकS-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

वयोमर्यादा-

  • जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक ३१ मार्च २०२३ या तारखेस गणण्यात येईल.
  • वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान वय १८ वर्ष असावे व वय खुल्या प्रवर्गासाठी कमाल ४० वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षांपेक्षा) जास्त नसावे.
  • सहाय्यक अधीक्षक या पदासाठी कमाल वय ४० वर्ष पेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षांपेक्षा) जास्त नसावे.
  • उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथीलक्षम
  • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत ४५ वर्षांपर्यंत
  • पात्र खेळाडूंच्या बाबतीत ४३ वर्षांपर्यंत
  • माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे. विकलांग माजी सैनिकांबाबतीत कमाल ४५ वर्षापर्यंत.
  • अनाथ उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षांपर्यंत.
  • अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत ५५ वर्षांपर्यंत.
  • भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत कमाल ४५ वर्षांपर्यंत
  • दि.०३/०३/२०२३ रोजीच्या सा.प्र.वि कडील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत खुले व मागास प्रवर्गासाठी दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी वय मर्यादा ४० वर्ष व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्ष) देण्यात येत आहे.

शैक्षणिक अर्हता व अनुभव :

पदाचे नावशैक्षणिक अर्हता व अनुभव
१. सहाय्यक अधीक्षक१. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी. २. पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३. वर्षाचा अनुभव असणे आवश्यक ३. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
२. वरिष्ठ लिपीक१. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी. २. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

फार्म भरण्‍याचा शुल्‍क

  • खुला प्रवर्ग- 720/-
  • मागास प्रवर्ग – 650/-

आवश्‍यक कागदपत्रे

  • उमेदवाराचे शै‍क्षणिक कागदपत्रे
  • दहावी, बारावी, कृषि पदविका डिप्लोमा, B.Sc. Agr. किंवा पदव्युत्तर कृषि पदवी
  • मान्यता प्राप्त MS-CIT प्रमाणपत्र
  • मान्यता प्राप्त मराठी, इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र
  • जात प्रवर्ग
  • जातीचे प्रमाणपत्र किंवा असल्यास जात वैधता प्रमाणपत्र
  • तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र
  • Email ID
  • Mobile Number
  • एक कलर फोटो
  • सही नमुना
  • स्‍वयंघोषणपत्र
  • आधार कार्ड
  • विवाहित असल्यास पतीचे नाव व एकूण अपत्य संख्या
  • लग्नानंतर नावात बदल असल्यास
  • कायमस्वरूपी व अस्थायी पत्ता

ऑनलाईन फार्म भरण्याचा कालावधी :

आनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी ६ एप्रिल पासून वेबसाईट सक्रिय झाली असून अर्ज करण्याचा अंतिम दि. २० एप्रिल २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत.

ऑनलाईन अर्ज कोठे भरावा :

Prajwal Digital Services, Behind SP Office, Near Veterinary Hospital (Gat No.2), Netaji Nagar, Sham Nagar Road, Latur, Maharashtra-413512 Contact: 9689644390, 02382-222290

Prajwal Digital

Leave a Reply