मुंबई- महाराष्ट्रात यापूर्वी पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणूका झालेल्या आहेत. मात्र उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील २६२० ग्रामपंचायतींच्या ३६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान प्रक्रिया राबविणार आहे.
विविध ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि सरपंचांचे निधन, राजीनामा, अपात्रता किंवा इतर कारणासाठी रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांसाठी २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत अर्ज दाखल करता येणार नाहीत.
सदर निवडणुकीची ३ मे रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया होईल. ८ मे रोजी दु. ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यादिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
१८ मे २०२३ स. ७:३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया होईल.
नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दु. ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होईल.
पोटनिवडणुकांमध्ये नवी मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका होणार आहेत.
सदर निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी सर्वच पक्ष कसून तयारी करत असून त्यात महाविकास आघाडीतील पक्ष स्थानिक आघाड्याद्वारे स्वतंत्र, तर भाजप आणि शिंदे गट एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपा व शिंदे गट एकत्र आल्यामुळे त्यांना सर्वात निवडणुकीत यश येण्याची अपेक्षा वाटत आहे. त्यामुळे सदर निवडणूक ही सर्वपक्षासाठी अत्यंत महत्त्वाची व निर्णायक ठरणार आहे.
राज्यातील २६२० ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हा लेख आपणास आवडला असल्यास तुमच्या १० मित्रांना शेअर करावा व कृषिविषयक बातम्या, चालूघडामोडी व नवनवीन सुधारित तंत्रज्ञान याबद्दल माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या Modern Agrotech या मराठी ब्लॉग वेबसाईटला Subscribe करून सहकार्य करावे.
राज्यातील 2620 ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
Helping इन्फॉर्मेशन