यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत कृषी शिक्षणक्रमासाठी सन २०२३-२३ करिता प्रवेश प्रक्रिया, वेळापत्रक व तारखा निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार विविध कृषी शिक्षणक्रम प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाचा प्रवेश व वेळापत्रकाची अंमलबजावणी केली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवी करिता नवीन प्रवेश घ्यावयाचा आहे, ज्या विद्यार्थ्यांना कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवी करिता पुढील वर्षांत प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी सन २०२३-२३ करिता प्रवेश घेण्यासंबंधी काही महत्त्वाच्या तारखा व माहिती विद्यापीठ स्तरावरून खालील प्रमाणे देण्यात येते.
कृषी शिक्षणक्रम प्रवेश वेळापत्रक :
1. प्रथम प्रवेश अर्ज (Online – Admission Form) भरण्याचा कालावधी : 13 ते 19 जून, 2023
2. प्रथम फेरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक: 26 जून, 2023
3. प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरी (First Merit List Admission Round) कालावधी : 27 जून ते 02 जुलै, 2023
4. दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक: 07 जुलै 2023
5. दुसरी गुणवत्ता यादी प्रवेश फेरी (Second Merit List Admission Round) दिनांक: 07 ते 11 जुलै, 2023
6. शिल्लक जागांची माहिती प्रसिद्ध करण्याचा दिनांक: 14 जुलै, 2023
7. शिल्लक राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश कालावधी : 17 ते 18 जुलै 2023 (शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देतांना प्रथम दिवशी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची शिक्षणक्रमानुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यात यावा)
8. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 01 ते 10 ऑगस्ट 2023
9. कृषी शिक्षण केंद्रांना पुस्तके वितरण करण्याचा कालावधी: 01 ते 10 ऑगस्ट 2023
10. शिक्षण केंद्रांवरील संपर्कसत्र तारखा:
a) कृषी अधिष्ठान शिक्षणक्रम : ऑगस्ट : 1, 5, 6, 12, 19, 20, 26, सप्टेंबर : 2,3,9,16, 17, 23, 30, ऑक्टोबर 1, 7, 8, 14, 21, 22,28 नोव्हेंबरः 4,5,11,25,26, डिसेंबरः 2, 3, 9, 16, 17, 23, 30, जानेवारी: 6, 13, 14, 20, 27, 28, फेब्रुवारी: 3
b) कृषी अधिष्ठान सोडून सर्व कृषी शिक्षणक्रम: ऑगस्ट: 1,5,6,12,19, 20, 26, सप्टेंबर: 2,3,9,16,17,23, 30, ऑक्टोबर 1,7,8, 14, 21, 22, 28, नोव्हेंबर: 4, 5, 11, 25, 26, डिसेंबर 2, 3, 9, 16, 17, 23, 30, जानेवारी: 6, 13, 14, 20
11. अंतर्गत परीक्षा तारखाः (सकाळी : रेग्युलर, दुपारी: रिपीटर परीक्षा)
a) कृषी अधिष्ठान शिक्षणक्रम: 16 सप्टेंबर 2023, 28 ऑक्टोबर 2023, 17 डिसेंबर, 2023 आणि 3 फेब्रुवारी 2024
b) कृषी अधिष्ठान सोडून सर्व कृषी शिक्षणक्रमः 3 सप्टेंबर 2023, 28 ऑक्टोबर 2023, 9 डिसेंबर, 2023 आणि 20 जानेवारी 2024
12. अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा (अभ्यासकेंद्रावर) कालावधी : 12 ते 26 फेब्रुवारी 2024
13. अंतिम लेखी परीक्षा (परीक्षा केंद्रावर) कालावधी: 05 ते 16 मार्च, 2024
अधिक माहितीसाठी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या Official Website (https://ycmou.digitaluniversity.ac) ला भेट द्यावी.
किशोर ससाणे, B.Sc. Agriculture Student, Mob.9689644390