दशरथ घास-कृषी सल्ला

शेतीव्यवसायामध्ये अन्नधान्य उत्पादनाबरोबरच जोडधंद्याचे स्थानही तितकेच महत्त्वाचे आहे. दुग्धव्यवसाय हाही त्यांपैकीच एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. दुभत्या जनावरांसाठी तसेच नांगरटीचे बैल यांसारख्या इतर जनावरांसाठी चाऱ्याचा पुरवठा सातत्याने होणे गरजेचे असते. त्यातही हिरवा चारा व वाळलेला चारा अशा दोन्ही प्रकारचा चारा ऋतुपरत्वे उपलब्ध होत असल्याने चाऱ्याचे अत्यंत योग्य नियोजन केले तरच  दुग्धव्यवसाय आर्थिक दृष्ट्या परवडू शकेल.

दशरथ घास हे द्विदल वर्गातील बहुवार्षिक चारा पीक आहे. यापासून किमान ५ वर्षे जनावरांना हिरवागार, कोवळा, लुसलुशीत सकस चारा मिळतो. या पिकाच्या मुळावर रायझोबियमच्या गाठी असल्यामुळे जमिनीचे आरोग्य देखील चांगले राहते. तसेच हिरवळीचे खत म्हणूनही वापर करता येतो.

Source: Agrowon

Prajwal Digital

Leave a Reply