अरबी समुद्रातील बिपॉरजॉय चक्रीयवादामुळे गती मिळाल्याने नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात रवाना झाले आहे. यंदा (2023-24) मॉन्सूनने जोरदार मुसंडी मारत तळ कोकणातील रत्नागिरी आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या काही भागांत चांगली मजल मारली आहे. मंगळवारपर्यंत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पुढील वाटचालीस पोषक हवामान कसे असेल?
- पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मंगळवारपर्यंत तमिळनाडूचा संपूर्ण भाग, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, संपूर्ण पूर्वोत्तर राज्य, सिक्कीमध्ये मॉन्सून दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
- महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह विदर्भ, मराठवाडा व खान्देश या भागात कमी अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शविण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मॉन्सूनची स्थिती कशी आहे ?
- महाराष्ट्रात मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा रत्नागिरी, शिवमोगा, हसन, धर्मापुरी, श्रीहरीकोटापर्यंत आहे.
- साधारणपणे ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल होईल.
- मंगळवारपर्यंत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत पावसाची प्रगती शक्य आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्र व महाराष्ट्रातील प्रमुख विभागात मॉन्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात रवाना झाला असून अद्याप पावसाची अतुरतेने बळीराजा वाट आहे. मात्र पावसाचे अद्याप सुरुवात झालेली नाही. यामुळे नेमकी पेरणी कधी करावी व पेरणी करिता पावसाची अजून तरी किती प्रतीक्षा करावी लागेल. अशा वाईट परिस्थितीत बळीराजा सापडलेला आहे. यामुळे महाराष्ट्रात 20 जूनपर्यंत जरी समाधानकारक पाऊस झाला तर ही बाब शेतकऱ्यांसाठी आशादायक ठरू शकेल.
स्त्रोत : पुणे वेधशाळा, हवामान विभाग, पुणे