फूड टेक्नॉलॉजी उद्योगातील शिक्षण संधी

अलीकडच्या काळात शेतीवर आधारित खूप मोठे उद्योग पुढे येत आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात अनेक संधी निर्माण झालेल्या असून आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला हवाबंद व पॅकिंग स्वरूपात पदार्थ उपलब्ध होत आहेत. यामुळे प्रक्रिया उद्योगाची भरभराट झालेली दिसून येत आहे.

  • अगामी काळात अन्न प्रक्रिया, अन्न तंत्रज्ञान, कोल्ड स्टोअरेज इत्यादी क्षेत्रात नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.
  • सरकारदेखील अन्नतंत्र प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि पाठबळ देत आहे.
  • व्यावसायिक आणि प्रशिक्षित विद्यार्थांना अन्नप्रक्रिया उद्योग, अन्नविज्ञान व तंत्रज्ञानातील विविध संशोधन आणि विकास क्षेत्रात चांगली संधी निर्माण होत आहे.
  • फूड टेक्नॉलॉजी (Food Technology) आणि फूड टेक्नॉलॉजिस्ट (Food Technologist) मुळे पौष्टिक आणि खाण्यास सुरक्षित पदार्थ निर्मिती करणे शक्य आहे.
  • अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये फळ प्रक्रिया, मसाले, जॅम, जेली, लोणचे, पनीर, श्रीखंड, ब्रेड, बिस्कीट, कोल्ड्रिंक इत्यादी पदार्थांचा समावेश आहे.
  • या संधीचा फायदा घेण्याकरिता फूड टेक्नॉलॉजी (Food Technology) हा एकमेव पर्याय आहे.
  • राजीव गांधी अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये बीटेक फूड टेक्नॉलॉजी (B-tech Food Technology) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य आहे.
  • कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यशाळा, विविध सरकारी योजनांची माहिती आणि एखाद्या प्रक्रिया उद्योगाबद्दल प्रशिक्षण आणि तो उद्योग सुरू करण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळते.
  • फूड टेक्नॉलॉजी करिता बारावी मध्ये गणित किंवा गणित, बायॉलॉजी विषय ही पात्रता आवश्यक आहे.

Benefit of Food Technology फूड टेक्नॉलॉजी फायदे

  • व्यावसायिक आणि प्रशिक्षित विद्यार्थांना अन्नप्रक्रिया उद्योग, अन्नविज्ञान व तंत्रज्ञानातील विविध संशोधन आणि विकास क्षेत्रात चांगली संधी निर्माण होईल.
  • फूड टेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजिस्ट मुळे पौष्टिक आणि खाण्यास उपयुक्त सुरक्षित पदार्थ निर्मिती करता येतील.
  • अन्नप्रक्रिया उद्योगामार्फत फळे प्रक्रिया, मसाले, जॅम, जेली, लोणचे, पनीर, श्रीखंड, ब्रेड, बिस्कीट, कोल्ड्रिंक इत्यादी पदार्थांची मागणी वाढेल.
  • कृषि आधारित कच्चा मालाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.
  • अन्न प्रक्रिया उद्योगातील शाश्वतता टिकवून राहील.
  • तरूणांना शिक्षण घेऊन अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करता येईल.

सचिन रेंगे, ९१५८८५०६०० (राजीव गांधी अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

Prajwal Digital

Leave a Reply