माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम-Gardening Training Course

शेती व्यवसायातील आमूलाग्र बदलांमुळे शेतकरी फलोत्पादन, फुलोत्पादन या क्षेत्राकडे वळत आहे. याचबरोबरीने शहरी भागात टेरेस गार्डन, परस शेती, भाजीपाला, फुलोत्पादनात रुची वाढत आहे. परसातील कमी जागेत औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर दिला जात आहे.या पार्श्वभूमीवर माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.

माळी प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असेल – What will be the nature of gardener training?

माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना झाडांची छाटणी, आकार देणे हिरवळ लावणे, पिशव्या भरणे, छाटणी करणे, फुलझाडे, फळझाडे व्यवस्थापनाविषयी शिक्षण दिले जाते.

माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम – Gardening Training Course

प्रस्तुत लेखामध्ये आपणास माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती मिळेल. माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमाची रूपरेखा स्पष्ट होईल. यातील रोजगाराची संधी, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व रोजगाराच्या संधी व माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविल्यामुळे होणारे फायदे याविषयी माहिती देण्यात येईल.  

अभ्यासक्रमाची रूपरेषा– Syllabus Outline

 • फळबागा लागवड, देखभाल, भाजीपाला लागवड, काढणी काढणीपश्चात तंत्रज्ञान आदींबाबत सखोल माहिती. हरितगृह तंत्रज्ञान, परसबागेतील लागवड तंत्रज्ञान, प्रात्यक्षिके, बोन्साय विषयाचा समावेश.
 • प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रामार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध. मुक्त विद्यापीठाच्या कृषी अधिष्ठान अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश.

रोजगार संधी– Employment opportunities

स्वतःचा व्यवसाय, रोपवाटिका, वास्तूंचे सुशोभीकरण, परसबागेतील सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड, फळबाग लागवड, विविध घरगुती, सांस्कृतिक कार्यक्रमातील फुलांची सजावट, भेटवस्तू निर्मिती, दवाखाने, खासगी कार्यालयातील बाग बगीचा देखभालीचे कंत्राट, शासकीय कार्यालयातील परिसर सुशोभीकरणाचे कंत्राट अशा संधी उपलब्ध आहेत.

पात्रता आणि निकष Eligibility and criteria

 • महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून नववी पास किंवा दहावी नापास विद्यार्थ्याला अभ्यासक्रमास प्रवेश.
 • विद्यार्थ्याचे वय १४ ते ३० दरम्यान असावे.
 • महिलांसाठी राखीव जागा.
 • अभ्यासक्रमासाठी कोणतीही शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध नाही.

आवश्यक कागदपत्रे Necessary documents

 • TC /शाळा सोडल्याचा दाखला.
 • Caste Certificate /जातीचे प्रमाणपत्र.

नोकरीच्या संधी– Job opportunities

राज्य तसेच केंद्र सरकार अखत्यारीत कार्यालय, शासनाचे विविध उपक्रम चालविणाऱ्या संस्था आदींमध्ये परिसर सुशोभीकरणासाठी शासनाने माळी या पदासाठी काही जागा आरक्षित केले आहेत. विशेषतः महिलांसाठी राखीव जागांची तरतूद आहे. नामांकित खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींना संस्थेत निमंत्रित करून कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

माळी प्रशिक्षणाचे फायदे- Benefits of Gardening Training

स्वतःचा व्यवसाय, रोपवाटिका, वास्तूंचे सुशोभीकरण, परसबागेतील सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड, फळबाग लागवड, विविध घरगुती, सांस्कृतिक कार्यक्रमातील फुलांची सजावट, भेटवस्तू निर्मिती, दवाखाने, खासगी कार्यालयातील बाग बगीचा देखभालीचे कंत्राट, शासकीय कार्यालयातील परिसर सुशोभीकरणाचे कंत्राट

 • फुलझाडे व फळझाडे व्यवस्थापनाविषयी शिक्षण मिळेल.  
 • रोपवाटिका, वास्तूंचे सुशोभीकरण, परसबागेतील सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड, फळबाग लागवड, विविध घरगुती, सांस्कृतिक कार्यक्रमातील फुलांची सजावट, भेटवस्तू निर्मिती, दवाखाने इ. मध्ये खूप संधी आहेत.
 • खासगी कार्यालयातील बाग बगीचा देखभालीचे कंत्राट मिळेल.
 • शासकीय कार्यालयातील परिसर सुशोभीकरणाचे कंत्राट घेता येईल.
 • रोपवाटिका, कृषी विभाग, शासकीय विभागात नोकरी उपलब्ध होईल.
 • प्रशिक्षणार्थी विद्यर्थ्यांना स्वतःचा व्यवसाय  सुरू करता येईल.
 • माळी प्रशिक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उभा होऊ शकेल.
 • वाढती बेकारी व बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात कमी करता येईल.

Praveen Sarwale ९७६७८३८१६५ (कृषी विद्या विभाग, डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती, जि. पुणे)

Prajwal Digital

Leave a Reply