विद्यार्थी आणि कृषी शिक्षण केंद्रांसाठी महत्त्वाच्या सूचना: 2023-24

१) कृषी शिक्षणक्रमांची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निश्चित केलेले आहे.

२) विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac या लिंक वर सर्व कृषी शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका (Prospectus) 2023, फॉर्म भरण्याचे प्रेझेन्टेशन, विविध परिपत्रके, प्रपत्रे ऑनलाइन प्रवेश अर्ज (online admission form) भरण्यासाठीचे ऑप्शन उपलब्ध करण्यात आलेले आहे.

३) सर्व विद्यार्थ्यांना, सर्व कृषी शिक्षण केंद्रप्रमुख आणि संयोजक यांना सुचित करण्यात येते की सर्वप्रथम विद्यापीठाच्या पोर्टलवरून या वर्षाची कृषी शिक्षणक्रम माहितीपुस्तिका 2023 डाऊनलोड करून व त्याची प्रिंट काढुन संपूर्णपणे व्यवस्थित वाचावी.

४) विद्यापीठ पोर्टलवर ऑनलाईन प्रवेश अर्ज अचूकपणे कसा भरावा या संदर्भातील प्रेझेंटेशन टाकण्यात आलेले आहे. कृपया ते व्यवस्थित डाऊनलोड करून संपूर्णपणे काळजीपूर्वक अभ्यासावे

५) सदरील ऑनलाइन फॉर्म भरते वेळी विद्यार्थ्याकडे पासपोर्ट साइज फोटोकॉपी, स्वतःची स्वाक्षरी असलेली फोटोकॉपी, जन्मदाखला, पात्रता परीक्षा गुणपत्रक, तसेच आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास त्यासंबंधीचे आरक्षण वर्गातील विविध दाखले / प्रमाणपत्रे (सामाजिक आरक्षणाचे, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्रे) इत्यादी बाबींचे अधिकृत मूळ दाखले/ प्रमाणपत्रे यांच्या पूर्णतः सुस्पष्टपणे स्कॅन केलेल्या सॉफ्टफोटोकॉपी (Image file) स्वतःकडे ऑनलाईन प्रवेश अर्ज संबंधित ठिकाणी अपलोड करण्यासाठी तयार ठेवाव्यात.

६) विद्यार्थी सदरील ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वतः त्याला उपलब्ध असलेल्या संगणकावर भरू शकेल, तथापि यासाठी अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित कृषी शिक्षण केंद्राची मदत घ्यावी.

७) विद्यापीठाने विहित केलेल्या कालावधीमध्येच संपूर्णतः अचूकपणे भरलेला सत्यता असलेला, तसेच सर्व अपलोड केलेले कागदपत्रे सुस्पष्ट दिसतील असे स्कॅन केलेले असलेले प्रवेश अर्जच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल याची कृपया सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

टीप : सदर सूचना ह्या फक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक मार्फत कृषि पदवीचे शिक्षण (बहिस्थ शिक्षण) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.

अधिक माहितीसाठी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या Official Website (https://ycmou.digitaluniversity.ac) ला भेट द्यावी.

किशोर ससाणे, B.Sc. Agriculture Student, Mob.9689644390

Prajwal Digital

Leave a Reply