कृषिविज्ञान व उद्यानविद्या पदवी करिता जे विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा अंतर्गत सन २०१९ पूर्वी प्रवेश घेतला असून, ज्या विद्यार्थ्यांचे तीन्ही वर्षांची अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप CET परीक्षा दिलेली आहे, परंतु प्रवेश घेतला नाही, किंवा प्रकल्प अहवाल सादर केला नाही, त्यांनी पुनर्परीक्षार्थी (Repeater Online Form Date: 1 to 10 August 2023) म्हणून यावर्षी ऑनलाईन पद्धतीने फार्म भरून प्रकल्प अहवालासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे. यासाठी खालील विद्यापीठ स्तरावरून दिलेल्या महत्त्वाच्या तारखा व सूचनांचे पालन विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी पदवी प्रकल्प अहवाल अभ्यासकेंद्रावर सादर करण्याचा कालावधी (1 प्रतीत): 10 ते 20 फेब्रुवारी 2024
- अभ्यासकेंद्रांनी प्रकल्प अहवाल विद्यापीठात सादर करण्याची तारीख: 21 ते 25 फेब्रुवारी 2024
- पदवी प्रकल्प मूल्यमापन कालावधी 10 ते 20 मार्च 2024
- पदवी प्रकल्प आधारित तोंडी परीक्षा (Viva Voce) कालावधी: 25 मार्च ते 05 एप्रिल 2024
- अंतिम पदवी प्रकल्प विद्यापीठास 1 प्रतीत सादर करण्याचा कालावधी: 01 ते 30 मे 2024
कृषिविज्ञान / उद्यानविद्या पदवी बंद करण्यासंबंधी महत्त्वाची सुचना-२०२३-२४
युजीसीच्या दिनांक 20 मार्च, 2019 रोजीच्या पत्रानुसार कृषिविज्ञान विद्याशाखेअंतर्गत कृषी विषयातील पदवी शिक्षणक्रम (B. Sc. Agri. आणि B. Sc. Horti.) बंद करण्यात आला आहे. त्यानुसार कृषिविज्ञान / उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमांसाठी प्रवेश दिले जाणार नाहीत.
शैक्षणिक वर्ष 2019 पूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सदर पदवीस प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वरील दोन्ही पदवी शिक्षणक्रम ग्राह्य धरण्यात येतील. सदरील दोन्ही शिक्षणक्रम महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागाच्या शासकीय निर्णयानुसार विविध शासकीय आस्थापना, नोकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाच्या संबंधित पदवी शिक्षणक्रमांबरोबर समकक्ष आहेत.
त्याचप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागाच्या शासन निर्णयानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, फळबागा उत्पादन पदविका, भाजीपाला उत्पादन पदविका, फुलशेती व प्रांगणउद्यान पदविका आणि कृषिव्यवसाय व्यवस्थापन पदविका हे शिक्षणक्रम कृषी विद्यापीठाच्या कृषी प्रमाणपत्र आणि कृषी पदविका शिक्षणक्रमांबरोबर समकक्ष आहेत. यास्तव सदरील प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षणक्रम सदर निर्णयानुसार शासनाच्या विविध शासकीय आस्थापना, नोकऱ्यांसाठी पात्र आहेत. शैक्षणिक वर्ष 2019 नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कृषी शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
नोट Note :
- सदर सूचना ह्या फक्त य. च. म. मु. विद्यापीठातून कृषी शिक्षण घेणा-यासाठी मर्यादित आहेत.
- ज्यांची कृषिविज्ञान /उद्यानविद्या पदवीचे शिक्षण अपूर्ण आहे किंवा 2019 पूर्व प्रवेशीत आहेत त्यांसाठी आहे.
- Repeater करिता सुवर्ण संधी आहे त्यांची पदवी पूर्ण करण्यासाठी त्यांनी याचा लाभ घ्यावा.
- अधिक माहितीसाठी विद्यापीठ सूचनांचे पालन करावे.
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या Official Website (https://ycmou.digitaluniversity.ac) ला भेट द्यावी.
किशोर ससाणे, B.Sc. Agriculture Student, Mob.9689644390