आपल्या देशाच्या भूभागाचे प्रवेशाद्वारे असलेल्या केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन झाल्याचे पुणे वेधशाळा हवामान विभागाने जाहीर केले आहे. केरळमधील बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या दक्षिण भागात गुरुवारी मॉन्सूनने प्रगती केली आहे. एल निनो (L Nino) च्या सावटामुळे यावर्षी पावसावर परिणाम होण्याची चर्चा सुरु असतानाच, केवळ मॉन्सूनचे केरळमधील आगमन तब्बल ७ दिवसांनी लांबले आहे.
मान्सूनचे विशेष महत्त्व :
- सरासरी ७ दिवस उशिराने मॉन्सून देवभूमी केरळमध्ये दाखील.
- दोन दिवसांत ईशान्येकडील राज्यात मॉन्सून दाखल होण्याची दाट शक्यता.
- जून ते सप्टेंबर या कालावधीत यावर्षी सुमारे ९६ टक्के पाऊस पडण्याचा संभाव्य अंदाज.
गतवर्षी पाऊसचे सर्व अंदाजे चुकीचे ठरत आहे. मात्र खरीप हंगाम चालू झाला असून अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे शेती व शेतीचे पावसाअभावी नुकसानीचे संकेत जाणवत आहेत. यामुळे यावर्षी नेमका पाऊस कधी पडणार याची अतुरतेने वाट शेतकरी बांधव पाहत आहेत.
जून ते सप्टेंबरमध्ये पडणार पाऊस
यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल ९६ टक्के पाऊस पडण्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे. या अंदाजात ५ टक्के कमी-जास्त पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात एल-निनो स्थिती राहण्याची, तसेच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) धन (पॉझिटीव्ह) राहण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे.
स्त्रोत : पुणे वेधशाळा, हवामान विभाग, पुणे