शेतकरी बांधवांना वन्य प्राण्यांपासून जीव वेठीस धरून शेतीचे कामे करावे लागत होती, त्यांना पशुधनांचा सांभाळ करणे व सुरक्षित ठेवणे कठीण जात असे. कधी कधी त्यांच्यावर वन्य प्राण्यांकडून प्राणांतिक हल्ला देखील होत असे. यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागत होता. याच अनुषंगाने वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला सध्या २० लाख रुपये मदत दिली जाते. त्यात वाढ करून २५ लाख रुपये मदत देण्यासाठी फाइल तयार केली आहे, त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी विधानसभेत दिली.
२५ लाखांची मदत कधी मिळेल?
वन्य प्राण्यांचा हल्ला आणि नुकसानीची मदत ३० दिवसात मिळणार आहे, परंतु काही कारणास्तव ३० दिवसात मदत न मिळाल्यास ती व्याजासहित देण्या संदर्भातील कायदा दुरुस्ती याच अधिवेशनात होणार आहे. असे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगितले.
नुकसान भरपाई स्वरूपाचे कसे असेल?
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास साधारणपणे २० लाख रुपये मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. सदर निर्णयात आता ही मदत २५ लाख रुपये करण्यात आली आहे.
कोणत्या घटकामुळे मृत्यू झाल्यास मिळेल मदत?
- वन्य प्राण्याच्या हल्ल्यात कायमचे अपंगत्व आले तर त्यासाठी देण्यात येणाऱ्या भरपाईत वाढ केली.
- गाय- म्हैस व बैलाचा मृत्यू झाल्यास १० हजार रुपयांवरून ७० हजार रुपये
- शेळी- मेंढी, बकरीचा मृत्यू झाल्यास १५ हजार रुपये.
- शेतीच्या नुकसानीसाठी १५ वरून २५ हजार.
- उसाच्या नुकसानीसाठी ४० रुपयांवरून ८०० रुपये.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील कुटुंबाना मिळेल का मदत ?
- काही सदस्यांनी वन्य प्राण्यांनी वाहनावर हल्ला केल्याने काही जणांचा रस्त्यावर आपटून मृत्यू झाल्याचे सांगत वन्य प्राण्यांच्या लिपिस्टक अधिवेशन हल्ल्याच्या खुणा मृताच्या शरीरावर नसल्याने भरपाई नाकारली जात असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
- रानडुक्कर, गवा रेडा, नीलगायींच्या हल्ल्यात अनेक अपघात झाल्याने त्या प्रकरणांत भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावर मुनगंटीवार यांनी, वन्य प्राण्यांच्या खुणा असल्याशिवाय मदत देण्यात अडचणी आहेत.
- सरसकट संबधितांचे जबाब ग्राह्य मानून मदत दिली तर अशा प्रकारे अपघात दाखवून मदत मिळविण्याचे प्रकार वाढतील.
निर्णयाचे फायदे :
- नुकसानग्रस्तांना तातडीने म्हणजेच ३० दिवसाच्या आत मदत देण्यात येईल.
- शासनाकडून सदर घटनेचा स्थळपाहणी पंचनामा केला जाईल.
- शासनाकडून नुकसानग्रस्तांच्या कुटुंबाना २५ लाखाची आर्थिक मदत मिळेल.
- रानडुकर व इतर प्राण्यांच्या हल्ल्यांचा समावेश यात असणार आहे.