पीकविमा योजनेस मान्यता, आता एक रुपयाचा हप्ता

महाराष्ट्र हे देशात विकासाचे गतीमान राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात पुढील तीन वर्षांसाठी पंतप्रधान पीकविमा योजना (Prime Minister’s Crop Insurance Scheme) राबविण्यासाठी ११ विमा कंपन्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यावर्षीपासून एक रुपयात पीकविमा काढता येईल. तर काढणीपश्चात नुकसानीसाठी ३० टक्के तंत्रज्ञान आधारित भारांकन निश्चित केले जाईल.  

जिल्हानिहाय निश्चित केलेल्या ११ कंपन्या (11 companies identified district wise)

  1. Nagar, Nashik, Chandrapur, Solapur, Jalgaon, Satara: Oriental Insurance Co. Ltd.
  2. Parbhani, Wardha, Nagpur: ICICI Lombard General Insurance Co. Ltd.
  3. Jalna, Gondia, Kolhapur : Universal Sompo General Insurance Co. Ltd.
  4. Nanded, Thane, Ratnagiri, Sindhudurg: United India Insurance Co. Ltd.
  5. Aurangabad, Bhandara, Palghar, Raigad: Cholamandalam MS. General Insurance Co. Ltd. Washim, Buldana, Sangli, Nandurbar: Agricultural Insurance Company of India
  6. Hingoli, Akola, Dhule, Pune: HDFC Irgo General Insurance Co. Ltd
  7. Yavatmal, Amravati, Gadchiroli: Reliance General Insurance Co. Ltd.
  8. Osmanabad: HDFC Agro General Insurance Co. Ltd.
  9. Latur : SBI General Insurance Co. Ltd.
  10. Beed : Agricultural Insurance Company of India

पीकविमा योजनेचे वेळापत्रक (Schedule of Crop Insurance Scheme)

  • शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : खरीप २०२३ (३१ जुलै)
  • खरीप २०२४ आणि २०२५ (१५ जुलै)
  • रब्बी हंगाम (Rabi season) : ३० नोव्हेंबर : ज्वारी, १५ डिसेंबर : गहू,
  • बाजरी, हरभरा, कांदा व इतर पिके,
  • ३१ मार्च : उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग.

पिकविमा योजनेविषयी थोडक्यात

केंद्र सरकारने यावर्षीपासून पीकविमा योजना राबविण्यासाठी नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. तसेच निर्देश राज्य सरकारला देण्यात आले होते. मागील वर्षांपासून राज्यात 80:110 म्हणजेच नफा-तोटा हस्तांतरण मॉडेलनुसार पीकविमा योजना राबविण्यात येते. ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के तर खरीप आणि रब्बी असा एकत्रीत पाच टक्के हप्ता राहील. यावर्षी पासून सर्वसमावेश पिकविमा योजनेंतर्गत केवळ एक रूपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

पीकविमा कसा मिळणार

  • हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान.
  • पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, क्रीड व रोग.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.
  • नैसर्गिक कारणांमुळे होणारे काढणीपश्चात्त नुकसान.
Prajwal Digital

Leave a Reply