सन २०२३-२४ करिता पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप हंगामासाठी पीकविमा काढण्यासाठी दिलेली मुदत ३१ जुलै २०२३ ला संपत असताना ऑनलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था बंद आणि दुसऱ्या बाजूला सतत ‘सर्व्हर डाउन’ अशा अडचणीत शेतकरी बांधव सापडले आहेत. त्यामुळे यंदा २०२३-२४ करिता विमा अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी राज्यभरातून होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु पिक विमा भरण्यासाठी अद्याप पर्यंत कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.
मुदतवाढ अशक्य, केंद्राचा हप्ता मिळण्यात तांत्रिक अडचणी
यंदा पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी मुदत वाढविण्याची मागणी संबंधित कार्यालयाकडून होत आहे. तथापि या मुदतीच्या पुढे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा पीकविम्यासाठी केंद्र सरकार हप्ता भरणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. परिणामी, मुदतवाढ मिळणे अशक्य आहे.
पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ न मिळाल्यास बहुतांशी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने विमा भरता येणार नाही, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकरी पिक विम्यापासून व मिळणाऱ्या लाभांपासून वंचित राहतील अशी शक्यता दर्शविली जात आहे. तरी देखील केंद्राच्या पिक विम्याची मुदत वाढमिळण्यासंबंधी आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
पिक विम्याची अंतिम मुदत किती आहे?
३१ जुलै २०२३ पर्यंत रात्री १२ वा.
पिक विम्याची मुदतवाढ मिळेल का?
राज्याच्या वतीने मुदतवाढ मिळण्याकरिता प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, मात्र अद्याप त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
पिक विम्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?
विहित नमुना फार्म, 7/12, बँक पासबुक, आधार कार्ड, स्वयंघोषित पीकफेरा इ.
पिक विमा भ्ररण्यासंबंधी संपर्क :
श्रध्दा ई सर्व्हिसेस, श्रध्दा डिजिटल फोटो स्टुडियो व आपले सरकार सेवा केंद्र, कोरे गार्डन कार्नर, कन्हेरी रोड, लातूर
खाडप चक्रधर मो.नं. +91 99237 62134