नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करा, अजित पवार

यंदा मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस पडलेला आहे. तेथील शेतीचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सदर अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणीदेखील पंचनामे त्वरित सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील सूचना

  • खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा वहितीयोग्य करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा तयार करावा.
  • बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानांतून धान्याचे वाटप तातडीने त्याच दिवशी होईल याकरिता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.
  • नियमांचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी चौकटीबाहेर जाऊन काम करावे लागले तरी त्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा.
  • पूरग्रस्त परिस्थितीमुळे ज्या गावांत, घरांत, रस्त्यांवर गाळ साचला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधी’ तसेच जिल्हा परिषदेतील निधीचा उपयोग करावा.
  • जिल्ह्यांना आगाऊ दिलेला ३० लाखांचा निधी वापरावा. निधी कमी पडल्यास तातडीने मागणी करण्याची सूचना त्यांनी केली.
Prajwal Digital

Leave a Reply