कंत्राटी कुक्कुटपालन करार आता मराठीत, पशुसंवर्धन विभागाच्या सूचना

कुक्कुटपालन व्यवसायाने राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी व बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. तरूणांसाठी कुक्कुट व्यवसाय सुरु करण्यास चांगली संधी व वाव निर्माण झालेला आहे. (Poultry Farming Agreement in Marathi) अलीकडच्या काळात मोठमोठ्या कंपन्या कंत्राटी तत्त्वावर शेतकरी व बेरोजगारांना कुक्कुट व्यवसाय सुरु करण्यास संधी देत आहेत.  

महाराष्ट्र राज्यात कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन वाढले असतानाच व्यवसायिक कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने करार केला जातो. त्यासाठीच्या करारनाम्यावर सोयीच्या अटी-शर्ती टाकून तो कळू नये, याकरिता इंग्रजी भाषेतच हा मसुदा तयार करून त्याची प्रतही शेतकऱ्यांना देण्याची तसदी घेतली जात नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना जाचक अटी व शर्तीचे पालन करणे अत्यंत कठीण जायचे, परिणामी कुक्कुट व्यवसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असत.

कुक्कुटपालकांच्या वाढत्या समस्या/ तक्रारींची दखल घेत इंग्रजी, मराठी या दोन्ही भाषेत हा करारनामा असावा, अशी सूचना पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. करारनाम्याची प्रत कुक्कुटपालकाला देण्याचे निर्देशही कंपन्यांना देण्यात आले आहेत. (Poultry Farming Agreement in Marathi)

कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन करण्यासाठी केंद्र शासनाने दिशानिर्देश निश्चित केले आहेत. त्यानुसार कुक्कुटपालक व व्यावसायिक कंपनीया दोघांनी सामंजस्य व समन्वयातून सदरच्या करारनाम्यातील अटी व शर्ती निश्चित कराव्यात. करारनामा मसुदा इंग्रजी व मराठी भाषेतून परिपत्रित करणे व मराठीतील करारनामा प्रत संबंधित कुक्कुटपालकाला देण्याची सूचना स्वागतार्ह आहे.

कंत्राटी कुक्कुट करार मराठीत झाल्यामुळे होणारे फायदे :

  • बेरोजगार तरूण व अल्पभुधारक शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करता येईल.
  • कंत्राटी कुक्कुट व्यवसायास प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण राहणार आहे.
  • करारनामा इंग्रजी व मराठीत झाल्यामुळे सर्व अटी व शर्ती समजण्यास मदत होईल.
  • करारातील कोणत्याही जाचक अटी व शर्तीचा शेतकऱ्यांकडून विरोध केला जाईल.
  • शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.

अतुल पेरसपुरे, संचालक, अमरावती पोल्ट्री व्यावसायिक संघ

Poultry Farming Agreement in Marathi

Prajwal Digital

Leave a Reply