कृषी माहितीचे उपयोगी मोबाईल ॲप

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या हाती स्मार्टफोन आणि त्यात वेगवाने इंटरनेट सेवा आलेली आहे. शेतकरी सुद्धा बदलत्या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करत आहेत. त्यासाठी काही कृषिविषयक माहिती देणारे अॅप शेतीसाठी उपयुक्त व वरदान ठरत आहेत. शेतकऱ्यांना या अॅपचा वापर करणे सोपे जावे यासाठी बऱ्याच अॅपमध्ये स्थानिक भाषेसह हिंदी, इंग्रजी व प्रादेशिक भाषा उपलब्ध केली जाते. हे अॅप गुगल प्लेस्टोअरवरून विनामूल्य म्हणजेच फ्रीमध्ये आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करता येतात.

अशा अॅप्सद्वारे शेती पद्धती, यंत्रसामग्री, बाजारभाव, पेरणीची परिस्थिती अशा प्रकारे अनेक माहिती मिळू शकते. बहुतांश अॅपही मोफत डाउनलोड करता येतात. शेतीविषयक सल्ले मोबाइलच्या माध्यमातून देण्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित नवनवीन मोबाइल ॲप्स विकसित करण्यात येत आहेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे देण्यात येत आहे.

) किसान रथ (KISAN’ Rath)

 • गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘KISAN’किसान असे टाइप करून हे अॅप डाउनलोड करता येते.
 • मिळणारी माहिती :
 • कृषी तसेच फलोत्पादन उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक सेवा प्रदात्यांना शोधण्यासाठी आणि संपर्क साधण्याची सुविधा.
 • ॲपमध्ये नोंदणी केल्यानंतर शेतीमाल वाहतुकीसाठी वाहतुकीची सेवा देणाऱ्यांची माहिती मिळते.
 • हिंदी आणि इंग्रजीसह निवडक भाषांमध्ये उपलब्ध.

) ॲग्री मार्केट मोबाइल अॅप (AgriMarket Mobile App)

 • AgriMarket हा केंद्र शासनाद्वारे विकसित केला आहे.
 • गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन AgriMarket असे टाइप करून हे अॅप डाउनलोड करता येते. किंवा mkisan पोर्टवरून डाउनलोड करता येते.
 • अॅपमधून माहिती मिळविण्यासाठी मोबाइल जीपीएस कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
 • त्यानंतर आपल्या ठिकाणापासून ५० कि.मी.
 • अंतरामध्ये येणाऱ्या बाजारपेठांतील विविध शेतीविषयक विविध माहिती उपलब्ध.
 • हिंदी, इंग्रजीसह काही स्थानिक भाषांमध्येही उपलब्ध.
 • राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध सेवा आणि योजनांबाबत माहिती पुरविते.

) पुसा कृषी (PUSA KRISHI)

 • भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्याद्वारे विकसित.
 • विविध पिकांच्या नवीन वाणांविषयी माहिती, संसाधन संवर्धन पद्धती.
 • कृषीमध्ये आवश्यक विविध यंत्रसामग्री विषयी माहिती.

) e-NAM (नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट)

 • ई-नाम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार.
 • एक देश एक व्यापार या संकल्पनेवर आधारित ई-नाम सुविधा आहे.
 • देशातील शेतकऱ्यांना हव्या त्या बाजारपेठेत शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य हेच ई-नाम चे मुख्य उद्दिष्ट आहे.

NAM फायदे :

 • जवळच्या बाजारातील शेतीमालाचे भाव पाहू शकता. तसेच शेतीमालाची खरेदी-विक्री करू शकता.
 • शेतीमालाचे ऑनलाइन पद्धतीने व्यवहार ई-नामच्या माध्यमातून करता येतात.
 • व्यवहार अधिक सोप्या पद्धतीने करण्यासाठी २०२२ मध्ये ई-नाम या अॅप लाँच करण्यात आले. त्यामुळे घरी बसून मोबाइल अॅपच्या मदतीने माहिती बाजारभावाची माहिती मिळू लागली.
 • ॲपमध्ये भाषा निवडण्याचा पर्याय दिसतो. त्यातून मराठी किंवा आपल्या सोयीनुसार भाषा निवडू शकता.
 • विविध बाजारपेठांतील दरांची माहिती मिळते.

) क्रॉप डॉक्टर (CROP DOCTOR)

 • हे अॅप इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपूर (छत्तीसगड) यांनी विकसित केले आहे.
 • गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन Crop Doctor असे इंग्रजीमध्ये टाइप करावे. त्यानंतर अधिकृत लोगो असलेले अॅप डाउनलोड करावे.
 • ॲपमध्ये विविध भाजीपाला पिके, कडधान्ये पिके, वेलबिया पिके अशा विविध पिकांबाबत माहिती मिळते. पिकांवर येणारे विविध कीड-रोग, पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे अशी विविध माहिती मिळते.
 • ॲप इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
 • याशिवाय विविध कृषी योजना, शेती अवजारे, आणि दैनंदिन कृषीविषयक बातम्या उपलब्ध आहेत.

) अग्रोवन

 • शेतीविषयक दैनंदिन माहिती देणारे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणून अॅग्रोवन ओळखले जाते. या वृत्तपत्रामध्ये विविध पिकांविषयीचे कृषी सल्ले, तज्ज्ञांचे मार्गदर्शक सल्ले, पीक संरक्षणाविषयी इत्यंभूत माहिती मिळते.
 • याशिवाय दैनंदिन बाजारभावाविषयी देखील सखोल माहिती पुरविली जाते. राज्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध प्रयोगांच्या यशकथा देखील दिल्या जातात. ॲग्रोवन वृत्तपत्राप्रमाणेच ॲग्रोवन ॲपमध्ये ही सर्व अपडेटेड माहिती उपलब्ध आहे.
 • ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन Agrowon असे इंग्रजीमध्ये टाइप करावे. त्यानंतर ॲग्रोवनचा अधिकृत लोगो असलेले अॅप डाउनलोड करावे.
 • त्याशिवाय अधिकृत ॲग्रोवन संकेतस्थळावर दैनंदिन वृत्तपत्राचा ई-पेपरदेखील उपलब्ध होतो.

मिळणारी माहिती

 • दैनंदिन बाजारभाव.
 • तज्ज्ञांचे कृषिविषयक माहिती देणारे तांत्रिक सल्ले, लेख.
 • कृषिविषयक बातम्या.
 • पीक संरक्षणविषयी माहिती.
 • कृषिपूरक व्यवसायांची माहिती.
 • दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन यांसारख्या कृषी आधारित क्रियाकलापांचा समावेश आहे.

) पीकविमा ॲप (Crop Insurance)

 • शेतकऱ्यांना मोबाइलवरून पीकविमा नोंदणी करता येण्यासाठी केंद्र सरकारद्वारे हे अॅप उपलब्ध करण्यात आले आहे.
 • गुगल प्लेस्टोअरमध्ये Crop Insurance नावाने हे अॅप उपलब्ध आहे.
 • या ॲपच्या मदतीने घरबसल्या पीकविम्यासाठी पिकांची नोंदणी करणे शक्य होते.
 • ॲप डाऊनलोड केल्यानंतर प्रथम त्यामध्ये संबंधित शेतकऱ्याचा चालू मोबाईल क्रमांक टाकून नंतर त्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागते. त्यानंतर पुढील नोंदणी करणे शक्य होते.

) मॉडर्न ॲग्रोटेक (Modern Agrotech)

 • मॉडर्न ॲग्रोटेक आजच्या डिजीटल युगातील एक शेती व शेतीशी संलग्नीत व्यवसायाविषयी उपयुक्त माहिती देणारी वेबसाईट आहे. Google मध्ये Modern Agrotech हे टाईप केल्यानंतर पहिल्या क्रमांकावर वेबसाईट ओपन होईल. सदर वेबसाईट ही मराठी भाषेत असून त्याचे भाषांतर आपणास हव्या त्या प्रादेशिक भाषेत करता येईल.
 • मॉडर्न ॲग्रोटेक मध्ये आपणास विनामूल्य कृषी हवामान, जमीन, पिके, फळे व भाजीपाला, बियाणे, लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया,  कृषि योजना, फलोत्पादन, पशुसंवर्धन, यांत्रिकीकरण व शेतकरी यशोगाथा इ. घटकांची सखोल व महत्त्वपूर्ण माहिती वाचक, शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि कंपन्या, कृषि शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना मिळेल. सदर कृषी माहितीचा उपयोग सर्वांना होणार आहे.
 • आजच्या आधुनिक युगात कृषी व त्यासंबंधी सर्व माहिती वाचकांना सुलभ भाषेत मिळावी व त्यांना सदर माहितीचा फायदा व्हावा या उद्देशाने बेवसाईट तयार केलेली आहे. याचा मूळ कोणताही वाईट हेतु किंवा तत्सम प्रक्रियेस चालना देणारा नाही. हा केवळ परिपूर्ण डिजीटल कृषी उपक्रम असून देशातील विशेषत: महाराष्ट्रातील सर्वच कृषी वाचक विद्यार्थी, कृषी संशोधन, कृषी संशोधक, कृषी विभाग, शासन निर्णय, शासकीय उपक्रमे, शेतकरी, बेरोजगार, कामगार, उद्योग, खाजगी कंपनी त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय कृषी कर्मचारी यांना विविध अंगाने आमच्या ब्लॉग वेबसाईटचा उपयोग होईल.
 • मॉडर्न ॲग्रोटेक या बेवसाईटद्वारे अतिशय कमीत खर्चामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी संबंधित शेतकरी, व्यवसायिक, कृषिसंलग्नीत कंपन्या व उद्योजकांची जाहिरात तयार करण्यात येणार आहे.
 • सदरील जाहिरातीमुळे कृषी उद्योजक आणि व्यवसायास चालना मिळेल व ग्राहकांना दर्जेदार, वस्तुनिष्ठ व विश्वसनीय उत्पादनाची माहिती मिळेल हा हेतू असल्याकारणाने मॉडर्न ॲग्रोटेक च्या मदतीने जाहिरात वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
 • सदर वेबसाईटवर चालू घडामोडीवर आधारित कृषि संबंधित उपयुक्त माहिती वाचकांना देण्यात येते.

मॉडर्न ॲग्रोटेकचे उद्देश

 • शेतकरी व उद्योजक यांच्यातील सामंजस्य वाढवणे.
 • कृषी माहितीचा प्रचार व प्रसार करून वाचक संख्या वाढविणे.
 • शेतकरी व व्यवसायिक यांचा थेट संपर्क वाढवणे.
 • उद्योजक व शेतकरी यांच्यातील खरेदी-विक्रीचा संपर्क जोडणे.
 • कृषी व कृषी संलग्नीत व्यवसायाची डिजीटल जाहीरात करणे.
 • नावीन्यपूर्ण कृषी उपक्रमाची माहिती देणे.
 • शेती व शेतीपूरक व्यवसाय वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे.  
 • शासकीय कृषी योजनांची शेतकऱ्यांना माहिती देणे.

अशा आहे की, आपणास शेतीउपयोगी सर्व ॲप व ब्लॉगची माहिती ‍मिळाली असेल. सदर ॲप्चा आपण उपयोग करून आपणास हवी असलेली कृषी संबंधीत माहिती प्राप्त करू शकतात. तसेच कृषी संबंधी नवीन शासकीय धोरणे, योजना व त्यासंबंधी आवश्यक अद्यावत विनामूल्य माहिती वरील ॲप्स किंवा वेबसाईटवर मिळू शकेल.

श्री. किशोर ससाणे, Website Admin

Prajwal Digital

Leave a Reply