मराठवाड्याची हंगामी पैसेवारी ५० च्या आत, जिल्हानिहाय जाणून घ्या गावे

मराठवाडा हा कायम मागासलेला व दुष्काळग्रस्त भाग म्हणून समजला जातो. प्रत्येक दोन ते तीन वर्षांनी येथे कोरडा किंवा ओला दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या ‍पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. यावर्षी (२०२३-२४) सुद्धा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांची लागवड केली होती, मात्र वेळेवर पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र शासन, विमा कंपन्या व प्रशासन या बाबत अजून तरी गंभीर झालेले दिसून येत नाहीत.

मराठवाड्यातील ८४९६ गावांपैकी ४५८४ गावांची खरीप हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे दुसरीकडे ३९१२ गावातील पैसेवारी ही ५० पैशांच्या पुढे आली आहे. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांचे आता सवलती, दुष्काळी निधी आणि नुकसानीच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.

५० च्या पुढील पैसेवारीची जिल्हानिहाय गावांची संख्या

  • धाराशिव- २५९
  • बीड- ३०१
  • परभणी- ८३२
  • नांदेड-८४२
  • जालना-९७१
  • हिंगोली-७०७

मराठवाड्यातील पावणेपाच लाख हेक्टर क्षेत्र पडीक

मराठवाड्यातील एकूण लागवडीयोग्य ५६ लाख ७ हजार ७१ हेक्टर क्षेत्रांपैकी ४ लाख ७२ हजार ५८४ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५१ हजार ८९२ हेक्टर, धाराशिव- १ लाख ४४ हजार ९४१ हेक्टर, परभणी- ३७ हजार ६४१ हेक्टर, नांदेडमधील ७२ हजार ८३२ हेक्टर, जालना- २५ हजार ५८१ हेक्टर, लातूर- २६ हजार ९४१ हेक्टर आणि हिंगोली २८ हजार १४२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

यंदा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाचे उत्पन्न पावसाच्या पाण्याअभावी घटलेले आहे. बहुतांशी प्रमाणात नुकसानीचे चटके शेतकऱ्यांना सोसावे लागत आहेत. मात्र शासन व संबंधित विमा कंपन्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीबाबत सकारात्मक नसल्याचे दिसून येते.

पैसेवारीचा थेट संबंध पूर्वी दुष्काळ जाहीर करण्याच्या अनुषंगाने यायचा. परंतु ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयाने पैसेवारीचे महत्व नेमके किती हे अधोरेखित झाले आहे. सुधारित खरीप पैसेवारी ३० ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यामुळे आता पावसाच्या खडांनी मोठे नुकसान केलेले असताना विमा कपंन्या, शासन शेतकऱ्यांना कसा आधार देणार याकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांनी यावर्षी (२०२३-२४) खरीप हंगामात पिकाची लागवड केली होती, मात्र पावसाचा खंड पडल्याने व पावसाअभावी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे, म्हणून झालेल्या नुकसानीपोटी शासन व विमा कंपनीकडून सरसकट भरीव आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र पिकांची पैसेवारी ५० च्या आत दर्शविली आहे, यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा लाभ नेमका कसा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More Article

व्याज सवलत योजना (ISS) पुन्हा लागू

खाद्यप्रक्रिया उद्योगाच्‍या विकास योजना

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

कृषी सुवर्ण कर्ज योजना

महिला बचत गटासाठी शासकीय योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना

Prajwal Digital

Leave a Reply