नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात यंदा देशात सुमारे ८२० मिलिमीटर पावसाची नोंद अद्यापपर्यंत झाली आहे. मात्र महाराष्ट्रात सुमारे ९६५.७ मिलिमीटर इतकी पाऊस पडला आहे. यातच ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या ईशान्य मॉन्सून हंगामात दक्षिण भारतात सर्वसाधारण पाऊस ८८ ते ११२ टक्के पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने जाहिर केली आहे.
यंदा (२०२३-२४) मॉन्सून हंगामात पडलेला पाऊस, मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण भारतात पडणाऱ्या पावसाचा अंदाज, २०२३ ऑक्टोबरमधील पावसाचा अंदाज यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाने माहिती दिली.
वायव्य भारतातून मॉन्सून परतला
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची थांबलेली परतीची वाटचाल पुन्हा सुरु झाली आहे. राजस्थानच्या आणखी काही भाग, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीसह, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरु झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांवर याचा खूप वाईट परिणाम झालेला आहे. काही ठिकाणी परतीच्या पावसाने जीवित हानी झालेली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पाऊस वेळेवर पडणे नितांत आवश्यक असते.
स्त्रोत : ॲग्रोवन दि. १ ॲक्टोबर २०२३