PM Kisan Yojana, लाभार्थ्यांना मिळणार ‘नमो’चा पहिला हप्ता चार दिवसांत

मुंबई: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत (PM Kisan Yojana) राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० सरकारने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी ९४ लाख २० हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य ८१५ शेतकरी पात्र ठरले आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. नमो चा दुसरा हप्ता पुढील महिन्यात वितरित करण्यात येईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पात्र लाभार्थ्यांना हफ्ता कधीपर्यंत मिळेल

शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी निधीच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

वर्षभरात तीन हप्त्यांत प्रत्येकी २ हजार रुपये असे ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यापैकी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चअखेर देणे प्रस्तावित आहे.

केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेच्या १४ व्या हप्त्यासोबत हा हप्ता वितरित होणे अपेक्षित होते, मात्र केंद्र सरकारकडून माहिती हस्तांतरित होण्यास वेळ लागल्याने हा हप्ता वेळेत वितरित होऊ शकला नाही.

योजनेसाठी लाभार्थी किती पात्र/अपात्र असतील

या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ कोटी १८ लाख ७१ हजार ३७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र छाननीअंतर्गत केवळ ९४ लाख २० हजार ८१५ शेतकरी पात्र ठरले आहेत. आता १ हजार ७२० कोटी रुपयांच्या वितरणास मान्यता दिल्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

योजनेस अपात्र शेतकऱ्यांनी काय करावे

सदर शेतकऱ्यांनी त्यांचेकडील आधारकार्ड व बँकपासबुक घेऊन संबंधित आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधून तेथे नाव नोंदणी करावयाची आहे. काही शेतकऱ्यांनी नोंदणी यापूर्वीच केली आहे, पण त्यांना पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी परत एकदा नव्याने KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर त्यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क :

श्रद्धा आपले सरकार सेवा केंद्र, कन्हेरी रोड, गोरे गार्डन जवळ, लातूर

खाडप चक्रधर मो.नं.9923762134

Prajwal Digital

Leave a Reply