आपण सोयाबीनचे सरासरी उत्पादन काढताना पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन ७० टक्के आणि तांत्रिक उत्पादन ३० टक्के गृहीत धरले जाते. समजा लातूर जिल्ह्यात हरंगुळ (बु.) मंडळात पीक कापणी प्रयोगातून हेक्टरी १ हजार किलो उत्पादन आले. तसेच तांत्रिक उत्पादन १ हजार ५०० किलो आले. तर सरासरी उत्पादन किती येईल.
अ) तांत्रिक उत्पादन पीक कापणी प्रयोगातील उत्पादनापेक्षा जास्त आल्यास
- पीक कापणी प्रयोगातील उत्पादनः १००० किलो
- तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन १५०० किलो
- (तांत्रिक उत्पादन कॅप @ ३०% = १३०० किलो)
- सरासरी उत्पादन = (१,००० x ०.७० = ७००) + (१,३०० x ०.३० = ३९०) = १,०९० किलो
- म्हणजेच हरंगुळ (बु.) मंडळाची सरासरी उत्पादकता हेक्टरी १०९० किलो.
ब) तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन पीक कापणी प्रयोगापेक्षा कमी आल्यास
- पीक कापणी प्रयोगातील उत्पादन = १००० किलो तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनः ६५० किलो.
- (तांत्रिक उत्पादन = कॅप @३०% ७०० किलो)
सरासरी उत्पादन : (१,००० x ०.७०) + (७०० x ०.३०) = ७०० + २१० = ९१० किलो म्हणजेच तांत्रिक उत्पादन पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास ९१० किलो सरासरी उत्पादन येईल.