सोयाबीन नुकसान भरपाई कशी काढली जाईल ?

सध्या सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग सुरु आहेत. त्यामुळे आपण सोयाबीनची नुकसानभरपाई कशी काढली जाईल, याचा आढावा घेऊ. हरंगुळ (बु.) मंडळातील सोयाबीनचे उंबरठा उत्पादन एक हजार किलो आहे. तांत्रिक उत्पादन पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनापेक्षा जर जास्त म्हणजेच १३०० किलो पकडले तर सरासरी उत्पादन १०९० किलो येईल. म्हणजेच सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त येईल. या परिस्थितीत हरंगुळ (बु.) मंडळातील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार नाही. पण तांत्रिक उत्पादन पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादनापेक्षा कमी आले तर आपण गृहीत धरलेल्या सूत्रानुसार सरासरी उत्पादन ९१० किलो येईल. म्हणजेच उंबरठा उत्पादनापेक्षा कमी येईल. तर नुकसान भरपाई किती मिळू शकते याचा अंदाज घेऊ.

वरील सूत्राचा वापर करून विश्लेषण केले असता हरंगुळ (बु.) मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी हेक्टरी ४, ९५० रुपये विमा भरपाई मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply