About Us

मॉडर्न ॲग्रोटेक (Modern Agrotech) ही एक शेती व शेतीशी संलग्नीत व्यवसायाविषयी उपयुक्त माहिती देणारी वेबसाईट आहे. ज्यामध्ये हवामान, जमीन, पिके, फळे व भाजीपाला, बियाणे, लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया, कृषि योजना, फलोत्पादन, पशुसंवर्धन, यांत्रिकीकरण व शेतकरी यशोगाथा, इ. घटकांची सखोल, सुलभ व महत्त्वपूर्ण माहिती वाचक, शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि कंपन्या, कृषि शिक्षण घेणारे विद्यार्थी आदींसाठी या संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग होईल.

अन्न सुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि पर्यावरण तंत्र जसे की मृदा संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन इत्यादींच्या दृष्टीने सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी शाश्वत शेती आवश्यक आहे. भारतीय कृषी क्षेत्र हे सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी हरित क्रांती, श्वेतक्रांती, पिवळी क्रांती आणि निळ्या क्रांतीचे प्रतीक आहे. या विभागात कृषी संबंधित उत्पादने, यंत्रसामग्री, संशोधन इत्यादींची माहिती दिली जाते. विविध शासकीय धोरणे, योजना, कृषी पतपुरवठा, शेतमालाचे बाजारभाव, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, रेशीम व्यवसाय इत्यादींची सविस्तर माहिती वाचकांना देण्यात येईल.

त्याचबरोबर मॉडर्न ॲग्रोटेक या बेवसाईटद्वारे अतिशय कमीत खर्चामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी संबंधित शेतकरी, व्यवसायिक, कृषिसंबंधीत कंपनी व उद्योजकांची जाहितीकरण करण्यात येणार आहे. सदरील जाहिरातीमुळे उद्योजकांच्या व्यवसायास चालना मिळेल व ग्राहकांना दर्जेदार, वस्तुनिष्ठ व विश्वसनीय उत्पादनाची माहिती मिळेल हा हेतू असल्याकारणाने मॉडर्न ॲग्रोटेक च्या मदतीने जाहिरात वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

धन्यवाद!

जय जवान जय किसान

About Owner :

Kishor Motiram Sasane

Contact: 91+9689644390

Email: [email protected]

Prajwal Digital